आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर भाजपने मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा, अशी मागणी केली. यावर काहींनी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव सुचवलं. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “…तर राष्ट्रपती राजवट स्वीकारून सगळाच कारभार केंद्राकडे द्या”
अजित पवारांना जर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, असा टोला पडळकरांनी यावेळी अजित पवारांना लगावला. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी यावेळी पडळकरांना लगावला. ते अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला लाज वाटली पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी
शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांची घेतली भेट
अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद पडळकर