आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्यानंत आता कर्नाटक येथील मराठी भाषिकांवर अत्याचाराचं होत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? फडणवीसांची घेतली भेट
शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’, हे बेगडी धंदे भाजपने आता बंद करावेत, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधी पक्षाला इतका कळवळा असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. याबद्दल राज्यातील सर्व भाजप नेत्यांनी तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदींबद्दल कोणी काही बोलले तर भाजपचे लोक सभागृहात गदारोळ करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणी बोलले तर यांना काही घेणंदेणं नसेल तर हे महाराष्ट्रद्रोही आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद पडळकर
महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे
“काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”