Home महाराष्ट्र अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद...

अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद पडळकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर भाजपने मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा, अशी मागणी केली. यावर काहींनी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव सुचवलं. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे

अजित पवारांना जर मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दिला, तर हे अधिवेशन संपायच्या आत चार दिवसांत ते राज्यच विकून मोकळं होतील, असा टोला पडळकरांनी यावेळी अजित पवारांना लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा प्रभार कुणाला तरी द्यावा यावर पहिली प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी, रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री करा, असा सल्ला यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका! कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपासोबत केली युती

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”