आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे.शिवसेना आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत हे भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज तानाजी सावंतांची चांगलीच घुटमळ झाल्याचं पाहायला मिळालं. तानाजी सावंत हे युती सरकारमध्ये जलसंधारण मंत्री राहिलेले आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना डावलण्यात आलं. त्यामुळे तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : अजित पवारांना जर मुख्यमंत्री केलं, तर ते 4 दिवसांत राज्य विकतील- गोपीचंद पडळकर
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्तीनंतर तानाजी सावंत यांनी फडणवीसांची धावती भेट घेतल्याचं चित्र विधानभवन परिसरात पाहायला मिळालं. पहिल्या दिवसाचं कामकाज संपल्यानंतर सावंत यांनी फडणवीसांची भेट घेतली.
दरम्यान, स्वत:च्या साखर कारखान्याच्या मुद्द्यावरुन ही भेट झाल्याचं सावंतांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीमध्ये महिलांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही- रूपाली पाटील ठोंबरे
“काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका! कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपासोबत केली युती