…हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

0
558

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. तसेच भाजपचे दिवंगत नेते यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरही कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : ‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

वाढदिवस साजरा करताना गरिबाच्या पोटाची भुक शमणार आहे का? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. स्वत:चा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार?, असा सवाल करत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

दरम्यान, खूप मोठी प्रतिकृती बनवली म्हणजे, पेंटींग केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते’; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

राष्ट्रवादीला निवडून दिलं तर 100 कोटींचा निधी देतो; अजितदादांची अजब अट

मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे पुन्हा सक्रिय; आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा दौऱ्यांचा सपाटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here