“शिवसेनेचा मनसेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत केला शिवसेनेत प्रवेश”

0
1359

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली कंबर जोरदार कसली आहे. तसेच पक्षात काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशात आता शिवसेनेनं मनसेला दणका दिला आहे.

हे ही वाचा : “आघाडीचा निर्णय व्हायचा तो होईल, सध्या तरी स्वबळावर लढायचंय गृहीत धरून तयारीला लागा”

मनसेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्याच आठवड्यापासून औरंगाबाद दाैऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच शिवसेनेनं मनसैनिकांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

“बीडमध्ये मनसेचा विजयी झेंडा; नांदूरघाट जिल्हा परिषद गटात मनसेचा उमेदवार बिनविरोध”

स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात; कंगणाच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा टोला

चंद्रकांत पाटील आपण शिवसेनेचं बोट धरून मोठं झालात हे विसरू नका; शंभूराज देसाईंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here