Home पुणे स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात; कंगणाच्या वक्तव्यावर काँग्रेस...

स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात; कंगणाच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : अभिनेत्री कंगना रनौत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर कंगणानर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली. आता यावरून काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : चंद्रकांत पाटील आपण शिवसेनेचं बोट धरून मोठं झालात हे विसरू नका; शंभूराज देसाईंचा इशारा

‘भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले,’ या कंगनाच्या वक्तव्याबद्दल तुम्हांला काय वाटते, असा प्रश्न केल्यावर कन्हैया कुमार यांनी उत्तर दिलं. स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, भीक मागून पुरस्कार मिळतात, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी कंगणाच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य हे संघर्ष, त्याग आणि बलिदान केल्यानंतरच मिळते. अनेकांनी आपल्या आयुष्याचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवले आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य मिळत नाही., असं म्हणत कन्हैया कुमार यांनी कंगणाच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनेत्री कंगणा रणाैत पुन्हा मुंबई हायकोर्टात, आता नवा गुन्हा रद्द करण्याची मागणी”

मी पंतप्रधानांसारखा नापास नाही, माझं मार्कशीट पाहू शकता; काँग्रेस नेत्याचा मोदींना टोला

शिवसेना-राष्ट्रावादीमध्ये ठिणगी; प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादीचे शिवसेनेवर गंभीर आरोप