“साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू”

0
275

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. या प्रकाराने मुंबई हादरली होती.

9 सप्टेंबरला या महिलेवर रात्री बलात्कार झाला होता. त्यानंतर तिच्या गुप्तांगात सळई घुसवण्याचा प्रयत्न करुन अमानुष अत्याचार केले होते. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पीडित महिलेला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. महिलेचं आतडे बाहेर आले होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रियाही केली होती. जोपर्यंत तिची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकत नाही, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र आज अखेर या महिलेचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना दहशतीखाली ठेवत आहेत- रवी राणा

नारायण राणेंना उंचीवरून काय बोलणार?; मनिषा कायंदे यांचा टोला

पंतप्रधान मोदींच्या काळात नोटाबंदी, जीएसटी मुळे देशातील लक्ष्मी घटली- राहुल गांधी

‘अडचणी आमच्या नाही तर, ठाकरे सरकारच्या वाढतील’; लूक आऊट सर्क्युलर नोटिसीवरुन नितेश राणेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here