Home महाराष्ट्र लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य...

लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोना आणि ओम्रिकाॅन विषाणूचा वाढता धोका पक्षात घेता राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे.

सार्वजनिक वाहतुकीतून दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. यामुळे बेस्टचे सर्व आगार व थांब्यांवरून सुटणाऱ्या बसमधून युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास किंवा लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांनाच परवानगी देण्यात येणार आहे. यावरून मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांना घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही; जयंत पाटलांचा टोला

दोन डोस झालेल्यां नागरिकांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळाली. मात्र 18 वर्षांखाली प्रवास करणाऱ्यांचे काय? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

‘लस नाही तर बस नाही,डोकं आहे पण मेंदू नाही, असं कॅप्शन देत संदीप देशपांडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच त्यांनी बेस्ट समोर शाळकरी मुले प्रवास करण्यासाठी विनंती करतानाचा (कार्टून) फोटोही शेअर केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अखेर महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरियंटची एन्ट्री; ‘या’ शहरात आढळला पहिला रूग्ण”

“कंगणा रणाैत आता निवडणुकीच्या रिंगणात?; करणार ‘राष्ट्रवादी’चा प्रचार”

अखेर ठरलं! सांगली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याकडे, तर कदम ठरवणार काँग्रेसचा उपाध्यक्ष!