Home महाराष्ट्र राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे

राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला. आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावरून नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “शिवसेनेच्या माजी नगरसेवकासाठी भाजप-मनसे मैदानात; चर्चांना उधाण”

राज्यातील आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असून मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. ते माध्यमांशी बोलत होते. राणे यांच्या या नव्या तारखेमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असंही राणेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीची कंगनाविरुद्ध बोरीवलीच्या न्यायालयात तक्रार

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सूरू होणार”