आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : ”महाविकास आघाडी सरकारला आता अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या नवीन वर्षात सरकार बदलणार आहे, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच विधान परिषदेसाठी भाजपा उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी भरण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटीलांनी हे विधान केलं आहे.
हे ही वाचा : सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी ‘शिवतिर्थ’वर
महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, याची कल्पना आहे. देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता असणार आहे. भविष्यात महाविकास आघाडी सरकार राज्यातून जाईल. त्यानंतर देशात आणि राज्यात भाजपा सत्तेत असेल. विश्वासघाताने गेलेले सरकार पुन्हा एकदा मेहनतीने आणता येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
किरीट सोमय्यांचा दिल्ली दौरा; वाढवणार महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी?
“भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का; मोठ्या नेत्यासह काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश?”
“जळगावमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, 20 जागांवर महाविकास आघाडी विजयी, रोहिणी खडसेंचा एकतर्फी विजय”