आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हे ही वाचा : भाजपचा ‘हा’ मोठा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?; लवकरच ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता”
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदींना नाइलाजाने घ्यावा लागला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला होता. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, असा टोला संजय राऊतांनी लगावला होता. यावरून आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत निम्मे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे ते आणि नवाब मलिक काहीही बोलत असतात. त्यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी झाली आहे. काँग्रेसनं एक कायदा तीन वेळा आणला आणि तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला. विरोधकांनी जे होईल त्याच्या विरोधात बोलायचं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
महाधिक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना आवाहन
“कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”
महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात