Home नाशिक “कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”

“कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केलेल्या या घोषणेनंतर विरोधकांनी आगामी काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतल्याची टीका केली विरोधकांकडून करण्यात आली. या टीकेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

टीका करणारे टीका करतच असतात, काम करणारे काम करत असतात. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता पंतप्रधानांनी कृषी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू काही लोक त्याला सातत्याने विरोध करत राहिल्यामुळे पंतप्रधानांनी काल स्पष्टपणे सांगितले की, काही लोकांना मी समजावून सांगण्यात कमी पडलो म्हणून मी हे कायदे परत घेत आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा : महाराष्ट्रात आता शिवसेनेला कुत्रंही भीक घालणार नाही; निलेश राणेंचा घणाघात

दरम्यान, लोकशाहीमध्ये अशाप्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा फार कमी लोक दाखवत असतात. मोदीजींनी तो मोठेपण दाखवला आहे. त्यामुळेच जे यासंदर्भात टिका करत आहेत, त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कधी काहीही केले नाही. जे काही केले आहे, ते मोदीजींनी केले. आज किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ज्याप्रकारे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. एकट्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना 9 हजार कोटी रुपयांची मदत त्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून जमा झाली आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ईडीच्या रडारवरील नारायण राणे भाजपमध्ये गेले मग, ते पवित्र झाले का?; शिवसेनेचा सवाल

100 कोटींच्या आरोपांवर शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं किरीट सोमय्यांना आवाहन, म्हणाले…

“मी मरेन तर महाराष्ट्रासाठी आणि मी जगेन तर महाराष्ट्रासाठीच; राज ठाकरेंकडून प्रबोधनकारांना श्रद्धांजली अर्पण”