आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून हालणार नाही. असा पवित्रा सदाभाऊ व पडळकरांनी घेतला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यात अस्तित्वात असलेले सरकार हे काळ्या पायाचे आहे. हे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्या लायकीचे आहे, अशी टीका यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केली.
हे ही वाचा : ‘शिवाज्ञा’ राज ठाकरेंनी व्यंग्यचित्रातून अर्पण केली बाबासाहेब पुरंदरेंना आदरांजली
एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारविरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. काळ्या पायाचे हे आघाडीचे सरकार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या गरीब लोकांवर अनेक संकटे आली. तेव्हा त्यांच्या संकटाच्या काळात या सरकारने काहीच मदत केली नाही. सरकारने जर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या नाहीत आणि त्यांच्याशी चर्चा केली नाही, तर हेच एसटी कर्मचारी तुमचे दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाहीत, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदानावर #एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी विरोधात काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांनी उपस्थित राहुन पाठिंबा दिला व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.@BJP4Maharashtra @Sadabhau_khot @maheshklandge pic.twitter.com/m8mD6OYv3u
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) November 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
विक्रम गोखलेंच्या ‘त्या’ वक्त्यावर अभिनेत्री स्वरा भास्करची प्रतिक्रिया, म्हणाली…
रुग्णालयात पेशंटला भगव्याचं रक्त असेल तरच देणार का?; अमोल कोल्हेंचा विक्रम गोखलेंना सवाल
रोहित शर्मा कर्णधार असताना विराट कोहलीला संघात काय स्थान असेल; स्वत: रोहितनं दिलं उत्तर, म्हणाला…