Home नांदेड महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजतापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने जोरदार तयारी केली होती. तसेच फोडाफोडीचे राजकारणही रंगले.

हे ही वाचा : समीर वानखेडेंना मनसेचा पाठिंबा? दोन शब्दांचं ट्विट; चर्चेला उधाण

देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. यानंतर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शिवसेनेतून  आलेले सुभाष साबणे यांना भाजपाकडून उमदेवारी जाहीर करण्यात आली.

कट्टर शिवसैनिक असलेले सुभाष साबणे यांनी अतिशय भावनिक होत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता या निवडणुकीत भाजप- महाविकासआघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली असून नेमकं कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

शिवसेनेचा भाजपला मोठा दणका; भाजपात गेलेले ‘ते’ 10 नगरसेवक ठरले अपात्र

“अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही भास्कर जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली”

”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”; नारायण राणेंची टीका