आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. आज HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हे ही वाचा : भाजपाने ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी- संजय राऊत
सोशल मीडियावर मात्र राज्याचे मुख्यमंत्री आजारपणात असल्याने कारभार पाहण्यासाठी केअर टेकर सीएमची चर्चा रंगली आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे हॉस्पिटलमधूनही काम करत आहेत. त्यासाठी त्यांना केअर टेकर मुख्यमंत्री नेमण्याची काही गरज नाही. काही बातम्या पसरल्या होत्या पण त्यात काही तथ्य नाही. मानेची वेदना हे काही केअरटेकर मुख्यमंत्री नेमण्याचे निमित्त असू शकत नाही. मुख्यमंत्री लवकरच बरे होऊन राज्याच्या सेवेत परततील, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात बिगबॉसचा शो सुरू आहे की काय?; ड्रग्स प्रकरणावरून पंकजा मुंडेचा सरकारला सवाल
भाजपाला मोठा धक्का! ‘या’ अभिनेत्रीने दिली पक्षाला सोडचिठ्ठी
भाजपच्या ‘या’ नेत्याला राष्ट्रवादीची साथ; इंदापूरात चर्चेला सुरूवात