Home महाराष्ट्र ‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील...

‘सरकार तुमचं आहे, हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवा’; इम्तियाज जलील यांचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. अशातच राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या जीआर म्हणजेच शासन निर्णयावर ‘औरंगाबाद’च्या अगोदर ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केला गेला आहे. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा’ असं थेट आव्हान दिलं आहे.

निवडणूक आली की हे धंदे सुरू होतात. ज्या अधिकाऱ्याने या जीआरवर सही केली त्यांना बडतर्फ करावे. तूम्ही तुमच्या मर्जीनुसार शहराचं नाव बदलू शकत नाही. सरकार तुमचं आहे, हिम्मत असेल तर करून दाखवा, असा इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे.

हे ही वाचा : …म्हणून मी नितीन गडकरींना भेटले; पंकजा मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यासाठी शासन स्तरावरही औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव पाठवून हालचाली केल्या होत्या. मात्र आता थेट शासनाच्या ‘जीआर’वरच संभाजीनगरचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदमध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचा जीआर सरकारने काढला आहे. त्या जीआरमध्ये राम भोगले यांच्या नावासमोर संभाजीनगर आणि नंतर औरंगाबाद असा उल्लेख केला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

संजय राऊतांना हिंदुत्व कळलेले नाही, यासाठी…; नारायण राणेंची टीका

वानखेडेंची नोकरी जातेय की मलिक यांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया; रामदास आठवलेंचा टोला

“अजित पवारांनी सांगितलेल्या सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी व्हावी”