आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मालेगाव : मालेगाव तालुका व परिसरात होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निवडणुकांमध्ये भाजपचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अद्वय हिरे यांच्याकडे सोपविली आहे.
मालेगावमधील सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष युवानेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. भाजप गटनेते सुनील गायकवाड व हिरे यांच्यात असलेले गैरसमज दूर झाले आहेत, असं माजीमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “मनसे एसटी कामगारांसोबत; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा”
गिरीश महाजन माजीमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत हिरे, गायकवाड, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्यात जळगाव येथे बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
मालेगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, बाजार समिती, शेतकरी संघ आदी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हिरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. हिरे यांच्या सक्रियतेमुळे मालेगावमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेना नेत्याच्या कार्यक्रमात भाजप आमदारांची हजेरी; चर्चांना उधाण
“महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?; उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक”