Home महाराष्ट्र अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका

अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत; अतुल भातखळकरांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामती येथे अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या भाजपावर खोचक टोले लगावले होते. याला प्रत्युत्तर देत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : “मोठी बातमी! आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी; ‘असे’ असतील नवीन दर”

‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’ अशी  टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, ‘जिद्द हवी. बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आले. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असते. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही आता बघत आहातच. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी – 

 शिवसेनेची मोठी घोषणा; आणखी एका राज्यात लढवणार निवडणूक

स्वाभिमान विकून वसुलीसाठी….; मनसेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

अजित पवार बनवाबनवी, लोकांची फसवा-फसवी थांबवा; किरीट सोमय्यांचा इशारा