आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. आता अशातच भाजपचे माढाचे खासदार रणजिंतसिंह निंबाळकर यांनी देखील मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच मोठ्या रणजित नेत्यांना ईडीची नोटीस येणार असल्याचं मोठं वक्तव्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकारणात घडामोडींना मोठा वेग आला आहे.
हे ही वाचा : काहीही झालं तरी, अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार; कोल्हापूरच्या ‘या’ माजी आमदाराची ग्वाही
दरम्यान, पुढे राष्ट्रवादीमध्ये कोणकोणत्या नेत्यांवर कारवाई होणार, हे लवकरच समोर येणार आहे. लवासा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बारा वर्षांनंतर समन्स बजावले आहे. यामध्ये सरकारने कारवाई करण्याचे धोरण ठरवले असेल तर यातून मोठा घोटाळा बाहेर येईल, असंही निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपच्या ‘या’ नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होणार, दिल्ली हायकोर्टाचे आदेश
नागपुरात शिवसेनेला मोठा धक्का, ‘या’ नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात सामील होणार?
गद्दार अधिवेशनाला आले, पण ते…; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल