“लोणावळामध्ये ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवडमधील युवकाचा मृत्यू”

0
191

लोणावळा : हाैशी आणि साहसी ट्रेकर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ढाक भैरव येथील 200 फूट दरीत कोसळून पिंपरी चिंचवड येथील एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रचिकेत भगवान काळे (वय 32) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 च्या सुमारास ढाक भैरव येथील गुहेतून खाली उतरताना प्रतिकचा हात सटकला व तो 200 फूट खोल दरीत पडला. त्याच त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याचवेळी लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र या संस्थेचे अनिकेत बोकील व दीपक पवार यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.

कामशेत पोलिस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली. तोवर अनिकेत व दीपक यांनी प्रचिकेतचा मृतदेह वर खेचण्याच्या दृष्टीने व्यवस्थित पॅक केला व तो वर खेचण्यासाठी संपूर्ण तयारी केली.

महत्वाच्या घडामोडी-

‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव झाली आई; घरी नव्या पाहुण्याचे आगमन

सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत; शिवसेनेचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना टोला

ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता- टाॅम मुडी

पॅट कमिंसची घातक गोलंदाजी; कोलकाताची राजस्थानवर 60 धावांनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here