नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी वरुन देशात अशांततेचं वातावरण असतानाच जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. यावर अभिनेता सुनील शेट्टी याने प्रतिक्रिया दिली आहे.
मारहाण केली तीही चेहरा झाकून, तुम्ही स्वत:ला मर्द म्हणत असाल तर खुलेआम करा सगळं. असे बुरखे लावून काम करणारे चोर असतात, असं म्हणत चेहरा झाकून आलेल्या हल्लेखोरांवर सुनील शेट्टीने संताप व्यक्त केला आहे.
जेएनयूमध्ये जे झालं ते खूप भयंकर आहे. हिंदू, मुस्लीम, शीख मी कोणीही असून शकतो, तसेच मी भाजप, काँग्रेस, शिवसेना कोणत्याही पक्षाचा असू शकतो. पण विद्येच्या मंदीरात जाऊन मारहाण करु शकत नाही, असंही सुनिल शेट्टीने म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-पहिल्याच बैठकीत शरद पवारांचा मंत्र्यांना मोलाचा सल्ला, म्हणतात…
-दिपीका पादुकोणचा विद्यार्थ्यांना पाठिंबा,जेएनयूमध्ये लावली हजेरी
-देवेंद्र फडणवीस यांना उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे- अनिल गोटे
-राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, मनसे भाजपसोबत जाणार?