सर्कशीतल्या जोकरप्रमाणे…; मनसेची सदावर्तेंवर सडकून टीका

0
229

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कर्तृत्व काय? असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकार सदावर्तेंच्या सुरक्षेसाठी 21 लाख का खर्च करतं?”, असा सवाल करत “सदावर्ते वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो. अशी टीका किल्लेदार यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा :  …म्हणून ‘ते’ गुन्हे मागे घेता येणार नाही; मनोज जरांगेंच्या मागणीवर फडणवीसांचं थेट विधान

सदावर्ते यांच्यावर 21 लाख खर्च करण्याइतपत त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे? या माणसाचं जनतेसाठी, नागरिकांसाठी काय योगदान आहे की, शासनाने या माणसाला सुरक्षा पुरवावी?”, असा सवाल यशवंत किल्लेदार यांनी केला.

“शांत बस, उगाच आमच्या नादाला लागू नकोस. मुर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस, त्याचं स्वत:चं एक अस्तित्व नाही. तो वेल्डिंगवाल्याचा चष्मा घालून फिरतो. सर्कशीतल्या जोकरप्रमाणे त्याचा वावर असतो”, असंही यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

‘मराठा आरक्षणावर राज्यपालांचं मोठं वक्तव्यं, म्हणाले…’

कंगना भाजपमधून निवडणूक लढणार? भाजप उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्यं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here