काँग्रेसचा भाजपला मोठा धक्का; तिवसा बाजार समितीत काँग्रेसची मुसंडी

0
215

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : राज्यातील आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी आज पार पडतेय. अशातच अमरावती जिल्ह्यातील तिवसा बाजार समितीचा निकाल समोर आला आहे.

तिवसा बाजार समितीत सर्वच जागांवर आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने बाजी मारली आहे. हा निकाल भाजप, शिवसेनेसाठी धक्कादायक आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी, ठाकरेंचा शिंदेंना दणका, ‘या’ निवडणूकीत मिळवली एकहाती सत्ता”

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज मतदान पार पडलं.यामध्ये सर्व 18 जागा आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने मुसंडी मारली.

दरम्यान, या निकालानंतर तिवसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष केला जातोय.

महत्त्वाच्या घडामोडी –

उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; आता शिंदेंचा पलटवार, म्हणाले…

राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले बदलाचे संकेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here