Home महाराष्ट्र राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं...

राज ठाकरे म्हणाले, बाहेर देता, तसं, काकांकडेही लक्ष द्या, आता अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांना, काय सल्ला द्याल असा प्रश्न केला. यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना, बाहेर लक्ष देता तसं आपल्या काकांकडेही लक्ष द्यावं, असा खोचक सल्ला दिला. याला आता अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ठीक आहे, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं, तसं मीही माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन., असं मिश्किली उत्तर अजित पवारांनी यावेळी दिलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, विलंब करून चालणार नाही; शरद पवारांनी दिले बदलाचे संकेत

दरम्यान, शरद पवारांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं विधान केलं. हे काही बदलाचे संकेत आहेत का? असा सवाल केल्यावर, अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी गेल्या 55-60 वर्षांच्या राजकीय जीवनात काही प्रसंग लक्षात घेऊन अनेकदा भाकरी फिरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नवे लोक पुढे आले आहेत, हे सर्वांनी पाहिलं आहे., असं अजित पवार म्हणाले. तसेच आम्ही चाळीशीत असताना शरद पवारांनी मला, आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी दिली. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात आम्ही आमचं काम दाखवू शकलो. जसं सगळ्यांना वाटतं की मला प्रमोशन मिळावं तसं नव्या कार्यकर्त्यांनाही वाटतं. माझीही तीच इच्छा आहे की, आमदारकी-खासदारकीत काही नवे चेहरे आले पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंकडे उरलेले सर्व आमदार अमच्या संपर्कात; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

उद्धव ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका, म्हणाले…