‘या’ युवा गोलंदाजाने केलं धोनीला बोल्ड, दूर उडून पडली दांडी; पहा व्हिडिओ

0
183

आयपीएलचा चौदावा हंगामाला येत्या 9 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील 11 मार्च रोजी, सरावाला सुरुवात केली आहे. अशातच मैदानावर सराव करत असतानाचा एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये धोनी फलंदाजी करताना दिसत आहे. तसेच युवा गोलंदाज हरीशंकर रेड्डी छोटा रनअप घेत धावत येतो. त्याच्या चेंडूवर शॉट खेळण्यापुर्वीच चेंडू जाऊन यष्टीला लागतो आणि यष्टी उडून दूर पडते. हे पाहून धोनीही थक्क होतो. दरम्यान, आपण चक्क धोनीची दांडी गुल केल्यामुळे हरीशंकर रेड्डीला खूप आनंद झालेला पाहायला मिळत आहे.

हरीशंकर रेड्डीला चेन्नई संघाने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. 22 वर्षीय रेड्डीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एमएस धोनीसोबत क्लिक केलेला सेल्फी पोस्ट केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये ‘ड्रीम पीक’ असे लिहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला

…त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

करूणा शर्मा आता राजकारणाच्या मैदानात; केली ‘ही’ मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here