Home महाराष्ट्र ‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘ही’ कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे.” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान,  राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊत यांना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री करा; चंद्रकांत पाटलांचा टोला

…त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

करूणा शर्मा आता राजकारणाच्या मैदानात; केली ‘ही’ मोठी घोषणा

“हे ठाकरे सरकारचे पाप; मुंबई पोलीसांची इतकी बदनामी कधीच झाली नव्हती”