Home महाराष्ट्र …त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

…त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात अखेर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. परमवीर सिंग यांच्या जागी आता हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार पाहणार आहेत. सरकारच्या या निर्णयावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सचिन वाझे यांना निलंबित असताना खात्यात घेणे क्राईममध्ये पोस्टिंग देणे, त्यांना प्रत्येक वेळी संरक्षण देणे, वाझे यांच्यावर कारवाई करण्यात विलंब लावणे, विरोधी पक्षाच्या दबावामुळे वाझे यांच्यावर कारवाई करणे त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली होणे, असं नारायण राणे म्हणाले.

माझ्या मते सचिन वाझे यांचा पूर्वेतिहास पाहता पोलीस खात्यात परत घेणे तसेच मनसुख हिरेन आणि अन्य हत्या. या सर्वांना जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

करूणा शर्मा आता राजकारणाच्या मैदानात; केली ‘ही’ मोठी घोषणा

“हे ठाकरे सरकारचे पाप; मुंबई पोलीसांची इतकी बदनामी कधीच झाली नव्हती”

मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी माझ्यावर दबाव होता; सचिन वाझेंसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता- देवेंद्र फडणवीस

“हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त”