महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर…; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं विधान

0
224

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : संसदेत नुकतंच, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्यात महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. अनेक वर्षांपासून रखडलेलं हे महिला आरक्षण विधेयक दोन दिवसात मंजूर झालं. यावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं असलं, तरी महिलांना आरक्षण 2024 ला मिळणार नाही, तर 2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; अमित शहा, फडणवीस, शिंदे यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी मी मागणी केली आहे. मराठा समाजातील गरीब कुटुंबाला आरक्षण मिळालं पाहिजे. मुस्लिम समाजाला आरक्षण देणे शक्य नाही, कारण ओबीसीमध्ये मुस्लिम समाज आरक्षणाचा लाभ घेत आहे, असंहीू रामदास आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिवसेनेत, राष्ट्रवादीत फूट पाडूनही, भाजपची परिस्थिती सुधारली नाही; रोहित पवारांची टोलेबाजी

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यास…; आमदार अपात्रेबाबत बच्चू कडूंचं मोठं विधान

मोठी बातमी! प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here