Home महाराष्ट्र सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; अमित शहा, फडणवीस, शिंदे यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना...

सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी; अमित शहा, फडणवीस, शिंदे यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सोमवारपासून विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणार आहे. सोमवारपासून या अपात्रतेबाबत सुनावणी सूरू होणार आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक दिवसीय दाैऱ्याकरिता मुंबईत आले आहेत.

मुंबईत त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमित शहा हे देवेंद्र फडणीवस यांच्या सागर निवासस्थानी पोहोचले होते. येथे अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा बऱ्याच वेळ चर्चा झाली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेत, राष्ट्रवादीत फूट पाडूनही, भाजपची परिस्थिती सुधारली नाही; रोहित पवारांची टोलेबाजी

दरम्यान, यावेळी आमदार अपात्रतेबाबतच्या रणनीती आणि आगामी निवडणुकांबाबत महत्वाची चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सागर बंगल्यावर इतर भाजप आणि शिंदे गटातील नेते उपस्थित होते. मात्र, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेच बंद दाराआड चर्चा करत होते.  त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविल्यास…; आमदार अपात्रेबाबत बच्चू कडूंचं मोठं विधान

मोठी बातमी! प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट