आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गणपतीचा बॅनर लावण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची एका महिलेला मारहाण केली होती. गुरुवारी सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला.त्यानंतर मनसेने पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
महिलेला मारहान केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव विनोद अरगिले असून तो मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत, हे आपण जबाबदारीने बोलतोय; शिंदे गटातील नेते रामदास कदमांचं वादग्रस्त विधान
मनसे पक्षाला आणि पक्षातील प्रत्येक घटकाला महिलांबाबत आदर कायम आहे. त्यामुळे पक्षातीलच कोणी असे कृत्य करणे हे बरोबर नाही. त्यामुळे विनोद अरगिले यांना पदावरून हटवण्यात येत आहे. असं पत्र बाळा नांदगावकर यांनी प्रसिद्ध केलं आहे.
मनसेत महिलांना नेहमीच आदर व सन्मान दिला जातो. काल मुंबादेवी विभागातील कामाठीपुरा परिसरात पक्षाचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली. महिलांवरील हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही. पक्षाने या घटनेची गंभीर दखल घेत अरगिले यांना पदमुक्त केले आहे. pic.twitter.com/T9bASZSyCb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) September 2, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात का?; पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर, म्हणाल्या….
मोठी बातमी! अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे