मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं यावर आता अनेक राजकीय पक्ष तसेच सामान्य जनता टीका करत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या प्रगतीत संपूर्ण मराठी माणसाचा वाटा आहे. मराठी उद्योग आणि व्यावसायिकांचा वाटा आहे. तसेच मराठी साहित्यीकांचा, मराठी लेखकांचा देखील मुंबईला आणि महाराष्ट्राला समृद्ध करण्यात वाटा आहे. त्यामुळे आपण राज्यापालांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा झटका; बाळासाहेबांचे ‘हे’ नातू शिंदे गटात सामील
दरम्यान, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…