Home महाराष्ट्र “या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं होतं.  मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही., असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : मराठी माणसाला डिवचू नका; वादग्रस्त विधानावरून, राज ठाकरे यांचा राज्यपाल कोश्यारींना इशारा

राज्यपाल हे भाज्यपाल आहेत. भाज्यपाल राज्यपालांनी पदावरून पायउतार व्हावे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यामुळे माफी नको, राज्यपालांनी पदावरून दूर व्हावे, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यामागे भाजप आहे असा आरोप करत या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करावी, असंही रुपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त विधान

मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द