Home महाराष्ट्र गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही; राज्यपालांचं...

गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबई आर्थिक राजधानी होणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलताना एक वादग्रस्त विधान केलं आहे.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केलं. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे ही वाचा : मराठा समाजाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाकडून EWS आरक्षण रद्द

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल, जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचं नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही., असं कोश्यारी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सत्ताबदलावर अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

“…तर शिंदे गटातील 3-4 आमदार पुन्हा शिवसेनेत परतणार?”

“राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार सत्तेत आलं, त्यामुळे ते कोसळणार म्हणजे कोसळणारच”