भाजपसोबत पुन्हा युती होणार का; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

0
711

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात सध्या शिवसेना भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकीय युद्ध पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये एकमेकांवर सातत्यानं आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. तसेच काही दिवसांपासून भाजप-शिवसेना युती होणार अशा चर्चा सुरू आहेत. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

‘ते ज्या पद्धतीनं चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीय का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला’, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपला लगावला. ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : किरीट सोमय्या भावा, माझे गाळे मला परत कर; किशोरी पेडणेकरांचा टोला

दरम्यान, कुणी कुणाला बांधील नसतं. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो पत्र चुकत असला तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असेल ते मला करणं भाग आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना CM करण्याच्या हालचाली सूरू, आता सुप्रिया सुळे म्हणतात…

“काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

जळगावातील शिवसेना-भाजप युतीवरून खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here