आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पक्षात 2 गट पडले आहेत. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा. त्यानंतर राष्ट्रवादी आमचीच, असं दोन्ही गटाकडून सांगण्यात येत आहे.
अजितदादांच्या या बंडाच्या निर्णयाचा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडूनही कुटुंबावर काहीच परिणाम होणार नसल्याचं वारंवार सांगितलं गेलं आहे. मात्र, आता दिवाळी तोंडावर आल्याने पवार कुटुंब दिवाळीत एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “मनसेचा मोठा राजकीय डाव, निवडणूकीआधी बारामतीत मोठ्या हालचाली”
आम्ही नेते म्हणून सर्व गोष्टी करत नाही. काहीवेळा कौटुंबिक नाती असतात. पवारांची दिवाळी कालही एकत्रित होती, आजही एकत्रित आहे आणि उद्याही एकत्रित राहील. राजकीय मतभेद जरूर झालेले आहेत. राजकीय मतभेद वेगळे असतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या बारामतीत माध्यमांशी बोलत होत्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘उद्धव ठाकरे यांना अटक करा’- नितेश राणे
“भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”