Home महाराष्ट्र “भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”

“भिवंडी हादरली, जीवे मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार”

111

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भिवंडी : भिवंडीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

7 जणांच्या टोळक्याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यातील चार आरोपीना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात दसरा-दिवाळीला पुन्हा एक राजकीय भूकंप होणार?; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गाैफ्यस्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार, 7 आरोपींमधील एक आरोपी पीडित मुलीच्या ओळखीचा होता. त्याने पीडितेला खरबाव रेल्वे स्थानकाजवळ बोलवलं होतं. अल्पवयीन मुलगी तिथे गेल्यानंतर या सात नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर याबाबत कोणाला काहीही सांगू नकोस’, असं आरोपींनी तिला धमकावत सांगितलं.

दरम्यान, पीडितेने तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यांच्यावर 376 डी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार असून त्या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सूरू आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जीवे मारण्याची धमकी”

…तर माझीच आता अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड इशारा

अजित दादा मुख्यमंत्री होणार?; खुद्द शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…