मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले..

0
190

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे: मिलिंद नार्वेकर ठाकरे गटात नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे, असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “आधी नाही म्हणाले, रागावले, चिडले, नंतर राज ठाकरेंनी जी कृती केली, त्याने सर्वांची मने जिंकली”

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपने सोडलेला फुसका बार आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर टीका केली आहे.

दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा तोच फुसका बार आहे. जो भाजपने सोडला आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

सांगलीत भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे…

शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार?, ठाकरे की शिंदे?; रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here