आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार गटात सामील होतील का? असा प्रश्न पडला होता. आता अशातचमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ही बातमी पण वाचा : “शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”
जयंत पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यापैकीच काही जणं आमच्याकडे लवकरच येतील. जयंत पाटीलही आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे, असं मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.
निवडूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना, अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदारांचं संख्याबळ आहे. जिल्हा अध्यक्ष आहेत. चिन्ह मिळायला आम्हाला काही हरकत नाही. निवडणूक आयोग निष्पक्षपने काम करतं, असंही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”
राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत आहेत – गुणरत्न सदावर्ते
टोलच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर काँग्रेसही आक्रमक: केली ‘ही’ महत्वाची मागणी