Home महाराष्ट्र “…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”

“…म्हणून छगन भुजबळ भाजपसोबत गेले”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठमोठे दावे केले. तसंच महाविकास आघाडीवरही टीका केली. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

ही बातमी पण वाचा : जयंत पाटीलही आमच्यासोबत येतील; अजित पवार गटातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केलेली आघाडी आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना छगन भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून बाहेर आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत याला काहीही महत्व नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिपद हवं होतं. ईडीपासून संरक्षण हवं होतं. म्हणून ते भाजपसोबत गेले आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

“शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”

राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत आहेत – गुणरत्न सदावर्ते