Home महाराष्ट्र “शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”

“शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर छगन भुजबळ संतापले, म्हणाले…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड करत 2 जुलै रोजी 40 आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह 8 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात झाली. पवार यांनी नाशिकच्या येवला येथे सभेला संबोधित केलं.

ही बातमी पण वाचा : “पंतप्रधान नरेंद्र मोदींना आताच हिमालयात पाठवा, देशाचं भलं होईल”

यात शरद पवार यांनी जनतेला हात जोडून सांगितलं, माझी चूक झाली. माझी चूक झाली याचा अर्थ असा घेतला गेला की, मी छगन भुजबळ यांना आतापर्यंत तुम्हाला मी मतदान करण्याचं आवाहन केलं, त्यांना तिकीट दिलं ही माझी चूक झाली. छगन भुजबळ हे शरद पवार यांना गुरु मानतात, म्हणून मी त्यांच्यावर आरोप करणार नाही, पण माझी चूक झाली, असं शरद पवार येवल्यात बोलले. आता यावरून छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मग मी कुठे कुठे सांगू, माझी चूक झाली. माझीही चूक झाली असं मला देखील म्हणता येईल, असं छगन भुजबळ म्हणाले. मला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असताना मी शरद पवार यांच्यासोबत आलो, तेव्हा तर कुणीच नव्हतं, जयंत पाटील, आर.आर पाटील हे देखील नव्हते. प्रफुल्ल पटेल हे देखील २ महिन्यात आले, पक्षाचं धोरण काय, पक्षाचा झेंडा, पक्षाचं नाव हे ठरवण्यापर्यंत, पक्षाच्या बैठका, दौरा यात माझं मोलाचं योगदान होतं, तेव्हा गावोगावी फिरलो. तेव्हा मी शरद पवार साहेबांना साथ दिली. तर ही माझी चूक होती का हे देखील मी बोलू शकतो, असंही भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

राज ठाकरे यांची पिलावळ मला फोन करून धमकी देत आहेत – गुणरत्न सदावर्ते

टोलच्या मुद्द्यावरुन मनसेनंतर काँग्रेसही आक्रमक: केली ‘ही’ महत्वाची मागणी

भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल