Home पुणे “पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”

“पिंपरीमध्ये अजित पवार करेक्ट कार्यक्रम करणार?; भाजपच्या नाराज, बंडखोरांशी साधला संवाद”

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष जोरदार तयारी करत असताना दिसत आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः पक्ष मजबुतीसाठी मैदानात उतरले आहे. भोसरी विधानसभेवर लक्ष केंद्रित करत या ठिकाणच्या बंडखोर आणि नाराजांशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्यानं भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या निवासस्थानी भोसरी भाजपातील काही नाराजांची बैठक घेतली. यावेळी भाजपमधून बाहेर पडलेले भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे व चिखलीतील नगरसेवक संजय नेवाळे यांच्याशी उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

दरम्यान, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजांशी संवाद साधल्याने लवकरच ते भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

सत्ता आली नसती पण संजय राऊतांच्या अंगात आलं आणि आघाडी सरकार स्थापन झालं- विश्वजित कदम

‘माजी मंत्री म्हणू नका’ वक्तव्यामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला; म्हणाले…

“भाजपला धक्का! राजकारणाला अलविदा म्हणणणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश”