Home महत्वाच्या बातम्या शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे  यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.  अशातच  शिवसेना कुणाची असा वाद सूरु झाला. या वादात आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

राज्यात आपल्यासोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, असं सांगत शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असल्याचं समर्थन करणारे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हे ही वाचा : “आउटगोईंगचं सत्र सूरू असतानाच, अहमदनगरमध्ये शिवसेनेत जोरदार इनकमिंग, 100 हून अधिक जणांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांकडे कागदपत्रे मागण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात दिलेल्या तारखेच्या आगोदर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रे सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोग त्यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रूपये कुठून आले?; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील मानेंविराधोत शिवसैनिक आक्रमक