Home महाराष्ट्र एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रूपये कुठून आले?; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री...

एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रूपये कुठून आले?; आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. 40 आमदारांनंतर आता शिवसेनेच्या 12 खासदार शिंदे गटात सामील झाले. अशातच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात मेळावे, सभा तसेच शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. या सभेत बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

एका रिक्षावाल्याकडे एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले?, असा सवाल करत जाहीर सभेत चंद्रकांत खैरेंनी करत एकनाथ शिंदेंवर टीका केली. मला एक आश्चर्य वाटतं, 1988 च्या नंतर एक रिक्षावाला एवढे कोट्यवधी रुपये कसे जमा करु शकतो? तसेच त्यांच्या पाठीमागे ईडी का नाही. आमच्या एक एका कार्यकर्त्यामागे ईडी लावता तुम्ही तर यांच्या पाठीमागे का नाही?, असा सवालही चंद्रकांत खैरेंनी यावेळी उपस्थित केला.

हे ही वाचा : जुन्नरमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार; ‘या’ नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

इथे जे जमले आहेत ते ठाकरे परिवाराचे आहेत. ही जनता फक्त ठाकरे कुटुंबाला मानते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आपण (आदित्य ठाकरे), असं चंद्रकांत खैरे मंचावर बसलेल्या आदित्य ठाकरेंकडे पाहत म्हणाले. तसेच आपण आता ज्या मार्गाने आलात, त्यावर किती लोक थांबले होते हे आपण पाहिलं असेल. ठाकरे बाहेर पडले की लगेच वलय निर्माण होतं, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर…; कोल्हापूरात खासदार धैर्यशील मानेंविराधोत शिवसैनिक आक्रमक

…तर आज उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर ही वेळच आली नसती; शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांची टीका

आज अजित पवारांचा वाढदिवस, अन् रोहित पवारांनी अशा दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले…