मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.
गेली साडेपाच वर्षे केंद्रात भाजपचे सरकार होते. ‘भारतरत्न’ देऊन सावरकरांचा सन्मान करण्यासाठी त्यांना कोणी रोखलं होतं? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
सावरकरांवर नक्राश्रू ढाळण्यापेक्षा नागरिकता विधेयकावरून देश का पेटला ? याचा विचार करा, असा प्रश्न भाजप केंद्र सरकारला सामनामधून विचारण्यात आला आहे.
दरम्यान, सावरकरांना माफीवीर आणि कलंक म्हणून हिणवणारे विधानसभेत भाजपच्याच बाकावर अहेत, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
-डॉ. लागू यांच्या निधनानं ट्वीटरवर हळहळ व्यक्त
-ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू याचं निधन
-भाजपनं उगाच इथं बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसै मागावे – उद्धव ठाकरे
-हे सरकार जेढवे दिवस सत्तेत राहील तेवढे दिवस वाट लावेल- चंद्रकांत पाटील