आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिल्लोड : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात आले होते. सिल्लोडमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी बोलताना सत्तार व शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
‘ओला दुष्काळ कुठे आहे, हे त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. खोके सरकारचे कृषीमंत्री आहेत. प्राथमिक सर्व्हे झाले का? मतदारसंघात फिरले का? पुणे-नाशिकमध्ये कोण कृषीमंत्री आहे हेच माहिती नाही. मला छोटा पप्पू म्हणता, मी स्वीकारतो, पण शेतकऱ्यांना मदत करा, मग मी पप्पू नाव स्वीकारतो,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : “ठाकरे गटात जोरदार इनकमिंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या कन्येनं हाती बांधलं शिवबंधन”
‘तुम्ही गद्दार आहात, हे सरकार 2-3 महिन्यांमध्ये कोसळणार आहे. मध्यावधी निवडणुका लागणार आहेत. हे गद्दार काय करत होते, यावर आम्ही नजर ठेवली नाही. कोणत्याही बाईला शिवी द्या, तसे संस्कार तुमच्या घरात असतील. या महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही,’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, आता उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
ऋतुजा लटके यांच्या विजयावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मशाल भडकली आणि…