आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुंबईमधील रुग्णसंख्या घटत आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमधील लसीकरण 100 टक्के पूर्ण होईल. यामुळे फ्रेबुवारीच्या अखेरीस मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ही लाट आता ओसरत आहे. रुग्णसंख्या 300 पर्यंत आली आहे. आता फक्त मुंबईत एकच इमारत सील आहे. पुढील आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये 100 टक्के लसीकरण पूर्ण होईल. यामुळे रुग्णसंख्या अशीच कमी राहिली तर फ्रेबुवारीच्या शेवटी मुंबई पूर्णपणे अनलॉक होईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…
दरम्यान, विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, मात्र जे काही अनलॉक झाले ते सर्व मुंबईकरासाठी केलं, असं सांगतानाच मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी झाली असली तरी केंद्र आणि राज्य सरकार मास्क घाला सांगत आहे. मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असं आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध; पोलिसांनी घेतलं शिवसैनिकांना ताब्यात
‘नमस्ते ट्रम्प’ मुळं देशात कोरोना पसरला, याला जबाबदार फक्त पंतप्रधान मोदीच- नवाब मलिक
“त्रिपुरात भाजपला मोठे धक्के, ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”