आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा आज जन्मदिन आहे. या निमित्ताने जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला.
मी आधीपासूनच शिवसेनेत आहे. आणि शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचा शब्द मनोहर जोशींनी यावेळी दिला.
हे ही वाचा : “मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू, काय बंद”
माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवातच शिवसेनेतून झाली आहे. माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आहे. शिवसेना ही संघटना महाराष्ट्रावर अतोनात प्रेम करते. बाळासाहेबांच्या अपेक्षा मी पूर्ण करु शकलो, याचे मला समाधान आहे. शिवसेनेनं मला मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचवले. त्यामुळे मी कधीही शिवसेनेला सोडू शकत नाही. राजकारणात सत्ता येते आणि जाते. मात्र मी आधीपासूनच शिवसेनेत आहे. यापुढेही शिवसेनेला चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंसोबत शेवटपर्यंत राहणार असल्याचे मनोहर जोशींनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“अखेर जत तालुक्याला न्याय मिळणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ मोठा घोषणा”
महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा येणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
राष्ट्रवादीने जातीच्या राजकारणासाठी शिवरायांचं नाव वापरलं; राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल