आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांची आस्थेनं चौकशी केली, हे कुणाला तरी पाहावलं जात नाही, त्यामुळे त्यांच्याविरोधात हे षडयंत्र तर नाही? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.
हे ही वाचा : “खासदार उदयनराजे भोसलेंचं, अजित पवारांना खुलं आवाहन, म्हणाले, हिंमत असेल तर…”
‘पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांची आस्थेनं चौकशी केली. व्यासपीठावर जेव्हा अजितदादांचं नाव पुकारलं नाही त्यावेळी खुद्द पंतप्रधान मोदी यांनी अजितदादा ‘आप नही भाषण करेंगे’, अशी विचारणा केली. त्यावेळी अजितदादांनी तुम्ही बोला, असं सांगितलं, असा खुलासा फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला
मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल