Home महाराष्ट्र पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : पंचायत राज समितीचे पथक काल सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये आमदार अनिल पाटील, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार किशोर दराडे व आमदार सदाभाऊ खोत होते.

आमदार सदाभाऊ खोत यांची गाडी पंचायत समितीच्या आवारात आली. गाडीमधून आमदार सदाभाऊ खोत उतरताच मांजरी (ता. सांगोला) येथील हॉटेल चालक व ग्रामपंचायत सदस्य अशोक शिनगारे यांनी ‘भाऊ, तुमचे तालुक्यात स्वागत. परंतु लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील माझी उधारी तेवढी अगोदर द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जावा. आधी आमचा निर्णय लावा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थितही बोलत नाही, असं म्हणत हॉटेल चालक अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ खोत यांच्याशी हुज्जत घातली. यानंतर खोत यांनी हा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप केला. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही  वाचा : सांगलीत मनसेच्या आंदोलनाला यश; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने मागितली महाराष्ट्राची माफी

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या. तुमच्यामुळे त्या हॉटेल मालकाच्या जिवाला धोका निर्माण होतोय अशी सगळीकडे चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी पोट फुटेस्तव आंदोलन करा . आणि पवार साहेबांची उंची गाठायला आणखी सात जन्म वाट बघा.. असं ट्विट करत अमोल मिटकरींनी सदाभाऊ खोतांना टोला लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सांगलीत मनसेच्या आंदोलनाला यश; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने मागितली महाराष्ट्राची माफी

सदाभाऊ, आधी हाॅटेलची उधारी द्या, मग पुढे जावा; सांगोलात हाॅटेल चालकानं सदाभाऊंचा ताफा अडवला

“काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”